देखभाल का दुरुस्ती ?
सायकल जनसामान्यांच्या जीवनाची अविभाज्य घटक आहे. परंपरेने सायकलचा वापर दळणवळण अथवा वहातुकीचे साधन म्हणून केला जातो. मुंबईचे डबेवाले असोत वा पुण्यातून एकेकाळी औद्योगिक वसाहतीकडे जाणारा कामगारांचा तांडा असो सायकलला पर्याय नव्हता. अजूनही काही ठिकाणी सायकल विकत घेण्यासाठी पैशांची साठवण केली जाते, इतके सायकलचे महत्व आहे.

काळ
बदलला औचित्य हरविले
दैनंदिन
वापरासाठी अत्यंत किफायतशीर, पर्यावरणस्नेही, आरोग्यदायी आणि परकीय चलन वाचविणारे
वाहन म्हणुन आधुनिक काळात खरतर सायकल लोकप्रीय होणे अपेक्षित होते. कालौघात
उपयुक्ततेची जागा प्रतिष्ठेने घेतली आणि पुण्यासारख्या शहरात तर सायकल
प्रतिष्ठाप्रतिक (स्टेटस सिंबॉल) बनली. परिणामी सायकल सामान्य राहिली नाही.
कोणत्याही
यंत्राचे सुचलन होण्यासाठी त्याची योग्य देखभाल आणि आवश्यकतेनुसार दुरूस्ती गरजेचे
असते. सायकलचे बाबतही हे सत्य आहे. बरेच वेळा देखभाल आणि दुरुस्तीमधे आपण गफलत
करतो. सायकलची नियमीत देखभाल आपण स्वतः घरच्या घरी करू शकतो याकरिता महिन्याकाठी
फक्त दोन तास खर्च करण्याची तयारी हवी. केवळ देखभालीपोटी ८००, १०००, १५०० रुपये खर्च करण्याची गरज नाहीये.
सायकलवर सर्रास असा खर्च केल्यामुळे सायकल महागडी बनत चालली आहे. वापरामुळे होणारी
झीज आणि मोडतोड याच्या दुरुस्तीकरिता उत्तमातील उत्तम आस्थापनाची सशुल्क सेवा जरूर
घ्यावी.
जनसामान्यांच्या
आवाक्यात सायकल वापर रहावा यासाठी सायकल-देखभाल किफायतशीर राखणे हे सजग
सायकलवीरांचे कर्तव्य आहे.

#MyBy
Maintain Your Bike Yourself
माहिती अथवा मदत यासाठी जरूर संपर्क करा.

#MyBy
Maintain Your Bike Yourself
माहिती अथवा मदत यासाठी जरूर संपर्क करा.
https://anandshodh.wordpress.com/category/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%80/

देखभाल वेळेवर केली तर दुरुस्तीची वेळ क्वचीत येते असा अनुभव आहे. आशा सायकलींचे पार्ट बराच काळ ऊत्तम काम करतात. मग सायकल रस्त्यात सहसा दगा देत नाही. प्रारथमिक देखभाल करणे तसे आवघड नाही.
ReplyDeleteखरं आहे, पण एव्हढा विचार कोण करणार?
Deleteधन्यवाद
Nice write up on a different subject!
ReplyDeleteWhen I was studying in NNV in 1960-1970,the school used to conduct more than 50 hobby classes and cycle repairing was one of them.
I wish someone starts such classes now.
धन्यवाद,
Deleteमराठी विज्ञान परिषद असा उपक्रम राबविते.
Good idea
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice Article !
ReplyDeleteYes Yes,Periodic Maintenance is must !
धन्यवाद,
Deleteस्टीच इन टाईम .... अशी म्हण आहेच.
लेख अपूर्ण वाटतो म्हणजे होत काय की लेख सुरु होतो उत्कंठा ताणली जाते आणि वाटत की आता तुम्ही सांगाल की सायकलची दुरुस्ती/देखभाल कशी करायची आणि त्याचवेळी लेख संपतो. ही क्रमश:लेखमालिका करू शकता... खूप उपयुक्त होईल ह्यात शंकाच नाही! एखादा सायकल "तोडण्याचा" आणि पुन्हा "जोडण्याची" चित्रफीत सुद्धा उपयुक्त ठरू शकेल..
ReplyDeleteधन्यवाद,
Deleteसूचना योग्य आहेत प्रयत्न नक्की करेन.
सायकलची चेन साफ करण्याची चित्रफित जोडल्यामुळे आता काही प्रमाणात समाधान झाले. ही क्रमश: लेखांची मालिका तुम्ही नक्की करू शकाल. तेवढा खजिना तुमच्याकडे नक्की आहे आणि हो त्यात अजून चित्रफिती जरूर जोडा!
Deleteधन्यवाद!
खूप छान लेखन
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteडॉक्टर खूप सुंदर व महत्वाची माहिती।
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete