पुण्यात रहाणेस आल्याने दापोली मधील मित्रांची भेट क्वचितच होते. दापोलीला गेलो असताना मित्राने; मी दापोली पर्यंत २० किमी सायकल चालवत जावून त्याला दिलेल्या 'मेजवानी' ची आठवण काढली. थोड्या गप्पा रंगल्या आणि मला जुन्या घटना आठवल्या.
पूर्वी शहरांत अमुक एका क्लब अथवा जिमखान्याचे मेंबर्स बाबत जसे कौतुक,
कुतूहल, औत्सुक्य असे तसे काहीसे शिकारीला जाणाऱ्या मंडळी बाबत गाव-खेड्यात असते. यांची टोपणनावेही खास असतात
आमच्याकडे एक जोडी होती, टारझन आणि डाबरमन. मी शाकाहारी असल्याने खरतर या जमातीत
आगन्तुकच. मिळालेल्या ‘मेजवानीचा’ आस्वाद घेण्याची माझी ऐपत नाही.

जंगलातून रात्री फिरण्याची एक वेगळीच मजा असते. चारी दिशांना पसरलेला मिट्ट अंधार असल्याने अंदाज बांधण्यासाठी पायवाटेवरील खाणाखुणा दिसत नाहीत. दिवसा ज्या पायवाटांवरून आपण फिरलेलो असतो तेच जंगल रात्री भयंकर गूढ, अनाकलनीय आणि भीतीदायक वाटते. पंचक्रोशीमधे जखमी डुकराने हल्ला करून गंभीर इजा झालेली एखादीतरी व्यक्ती असते, त्यामुळे अशा अदृश्य शक्तीची भीती मनात असतेच, किर्र अंधारात ती आणखी गहन होते. शिकारी साठी फिरताना मोठ्या प्रकाशाची विजेरीही वापरू शकत नाही. मोठ्या प्रकाशझोताची एक बॅटरी सोबत असते पण ती फक्त सावजाचा शोध घेण्यासाठी. पुढे चालणाऱ्याच्या हातातील बॅटरीचा उजेड त्याच्या पायाखाली पडत असतो उरलेले भिडू त्याच्या मागोमाग अंदाजाने मुंग्यांसारखी रांग करून चालतात. खांद्यावरील अवजड बंदुकीचे ओझे आणि आपला तोल सांभाळत चालणे म्हणजे परीक्षाच. वाटेत काटे-कुटे, खाच-खळगे, दगड-धोंडे, विविध वेली यांना चुकवत, पायांचा कमीतकमी आवाज करत समोरच्या व्यक्तीच्या चालीने मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. बर पायात हंटर किंवा ट्रेकिंग शूज नाहीतच, बहुदा स्लीपर- सॅंडल म्हणजे चैन आणि फुल पँन्ट कापून केलेली अर्धी चड्डी हा गणवेश. बंदुकधारी (बरकनदाराचा) वेश पण खास. मुंबईकर, मित्र किंवा पाहुणा याने दिलेला कोट अथवा जाकेट, त्याला २-४ खिसे वेगवेगळ्या ताकतीची काडतुसे ठेवण्यास गरजेचे. दोन प्रकारची नियमित मिळणारी काडतुसे आणि एक हायब्रिड म्हणजे भरलेले काडतूस . भरलेले म्हणजे ३ काडतुसांतील मालमसाला काढून दोनात भरायचा आणि शे दीडशे छोट्या गोळ्या काढून १५-२० मोठ्या गोळ्या भरायच्या. प्रत्येक काडतूस कधी आणि कोणासाठी वापरायचे यांचे ठोकताळे ठरलेले असतात. रात्री चालताना कान उघडे ठेवून सतर्क राहून बारीकसारीक आवाज टिपावे लागतात. सळसळ, फरफर, फ्रूक, ख्याक अशा विविध आणि विचित्र आवाजांचे सतत विश्लेषण करावे लागते. यात रात्री नेहमी चकवा देणारा प्राणी म्हणजे उंदीर. उंदीर सुक्या पानावरून धावत गेल्यास त्या भयाण शांततेत मोठे सावज गेल्याचा भास होतो.
सामान्यपणे रानडुक्कर, जंगली ससा, साळींदर, भेकर (हरीण वर्गातील प्राणी) हे
हिटलिस्ट वर असतात. ससा, भेकर, साळींदर यांच्या ठावठिकाण्याचा अंदाज बांधता येतो.
रानडुक्कर म्हणजे धूमकेतूच, कधी कोठून उगवेल याचा नेम नाही. चालता चालता कोणाचातरी
कान एखादा आवाज टिपतो. लगेच श्शू s s s .....अशा सांकेतिक भाषेत संदेश पसरतो.
सर्वजण स्तब्ध उभे राहून कानात जीव ओतून आपापल्या परीने आवाजाचा वेध घेतात.
काळोखातच हातवारे, खाणाखुणा करून सावजाचा अंदाज घेऊन बॅटरी टाकण्याची सूचना मिळते. बॅटरी टाकणे
म्हणजे सावजाच्या दिशेने प्रकाशझोत टाकणे. बॅटरी धरणारा लगेच इप्सित दिशेने
प्रकाशझोत टाकतो, बहुतेक वेळा तिथे कोणी नसतेच. मग आजूबाजूला, झाडाझुडपात, बांधावर
शोध सुरु होतो, अचानक कोणाचातरी डोळा लागतो ; डोळा लागतो म्हणजे प्रकाशझोतात
सावजाचा डोळा चमकतो. क्षणभर पुन्हा सगळे शांत, वातावरण एकदम तंग.. ९० टक्के वेळा
तो कापूरकवडा असतो आणि क्षणात तो भुर्रकन उडूनही जातो. १५-२० मिनिटांच्या या तंग, तणावपूर्ण
खेळाचा अंत अशा फुसक्या बाराने होतो. या डोळे लागण्यावरूनच सावजाचा अंदाज बांधून
पुढील सर्व निर्णय घ्यावे लागतात. त्याच मुळे विजेरीवाला हा चलाख, सतर्क आणि
अनुभवी असावा लागतो.
तासावर तास, दिवसामागून दिवस हा लपाछपीचा खेळ सुरु असतो. शिकार फार क्वचितच मिळते
पण त्या थराराची नशा चढते आणि दारुडे जसे रोज आपल्या पंढरीची वारी करतात तसेच
काहीसे शिकारीला जाणाऱ्यांचे होते. जणू व्यसनच, एकदा लागलं की सुटका नाही.
Ramdas Mahajan !
Ramdas Mahajan !


Nice, wonderful!
ReplyDeleteExperiences shared wonderfully.
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteVery nice write up !Snapshots are also wonderful. Remembered Vyankatesh Madgulkar.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteतुम्हाला त्यांची आठवण झाली हे वाचून धन्य झालो, त्याच बरोबर जबाबदारीची जाणीवही झाली. पुनश्च धन्यवाद.
एकदम झकास! अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखे वाटले!
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteप्रतिक्रियेने हुरूप आला.
वाह!
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteतुमच्या दोन अक्षरांची किंमत शब्दात व्यक्त करणे कठीण.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteछान विश्लेषण
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteरामदास, थरार जमलाय रे!धाकधुक झाली!!!
ReplyDeleteहेची फळ मम तपाला. धन्यवाद.
ReplyDeleteसुंदर लेखन असेच सुरू ठेव
ReplyDeleteधन्यवाद शिरीष. माझं लेखनातील 'कर्तुत्व' बघून सुखद धक्का बसला असेल.
Deleteसुंदर लेखन असेच सुरू ठेव
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDeleteVery informatibe DrRamdas. interesting.... I had seen once in the night while reurning from Dabhol or Dapoli to Kolthare, via Bourondi, a Hyena.... Or such animal in the night.. We were all scared but then we were in TRacks....
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteरात्री निर्जन आडवाटेने फिरण्यातील थरार अनुभवणे ही एक मज्जाच असते. तुम्ही नशीबवान म्हणायचे.
mast
ReplyDeleteThanks.
ReplyDeleteI cud see mid night hunt in front of my eyes- good narrative- Rishi
ReplyDeleteRamRam,
DeleteThank you very much for your reply. Extremely sorry for late reply. Please do read my other blogs.