प्रवासी मुख्यत्वे दोन जातीचे असतात. भटके आणि पर्यटक. दोहोंतील मूलभूत फरक म्हणजे भटक्यांचा हेतु भटकणे हा एकच, पर्यटक मात्र उपभोक्ता बनून सढळ हस्ते खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे राष्ट्रकर्म देखील करत असतात.
गेल्या वर्षी मी माझ्या भटकंतीमधील अनुभवांचे संकलन 'रामराम' या पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध केले. अनेक जणांनी दोन रास्त शंका उपस्थित केल्या. यासाठी पैसा आणि वेळ कुठून येतो ? वेळे विषयी मी मौन धारण करणेच योग्य ठरेल, पण पैसा मात्र डोंगरा ऐव्हढा निश्चितच लागत नाही.
नुकतीच मी आणि माझा मित्र विवेक मराठे दोघांनी 'उत्तरकन्नडाजंगल सायकलसफर' पूर्ण केली. जाने. १८ ला रात्री पुण्यनगरी सोडली आणि २७ पहाटे आगमन झाले. विवेकचा चाणाक्ष स्वभाव आणि सुखासिनता ( कंफर्ट झोन) त्यागण्याची दोघांची तयारी यामुळे आमची आनंदी सफर फक्त रु सहा हजार प्रत्येकी खर्चात पूर्ण झाली.
माझ्या मागील काही सफरींचा खर्च तपशिल आवर्जुन देत आहे. काही सफरी खर्चिक झाल्या आहेत पण तो नियम नाही.
भटके हे भटकेच रहाणार, पर्यटकांनी उगा त्रागा करून घेवू नये. भटके निरुपयोगी जमात आहे पर्यटकांनी सढळ हस्ते खर्च करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे पवित्र काम सुरू ठेवावे.
चालत रहा चरत रहा ....






Very nice Congratulations for this adventure
ReplyDeleteThank you very much.
Deleteफार सुंदर 👌🏼✌🏼
ReplyDeleteरामराम,
Deleteधन्यवाद.
महाजनो येन गत:.....स पन्थ: !! ��
ReplyDeleteरामराम,
Deleteपण सावधानतेने
धन्यवाद.
एकदम बरोबर मस्त
ReplyDeleteरामराम,
Deleteधन्यवाद
Very economical way of enjoying life, keep it up!You can make it more eco-friendly by planting seeds on your way!You can say that I have plenty of time at my disposal as I have achieved financial freedom at young age
ReplyDeleteरामराम,
ReplyDeleteधन्यवाद, सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. चांगला 'गुरु' लाभल्याने आर्थिक बाब योग्य वाटेवर आहे असे म्हणू शकतो.
भटके निरुपयोगी ?
ReplyDeleteअसहमत.
त्यांची उपयुक्तता व मूल्य पारखणाऱ्या "जोहरीं"ची उणीव म्हण हवे तर.
रामराम,
ReplyDeleteप्रशंसेकरिता धन्यवाद,