Sunday, 17 September 2017

गरुडझेप White Bellied Sea Eagle









गरुडझेप
समुद्रकिनारी खेडेगावात रहात असल्याने समुद्र आणि एकूणच निसर्गाशी जवळचा संबंध येतो. निसर्गप्रेम आणि धडपडा स्वभाव यामुळे चिपळूणचे श्री. भाऊ काटदरे यांचेशी संपर्क आला, ते ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था चालवितात. समुद्री कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ते करतात. आम्ही हे काम सुरु केले तेव्हा ते ‘इन’ किंवा ‘कूल’ समजले जात नव्हते. अता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातो त्यामुळे तळमळीने काम करू इच्छिणारी मंडळी कामात सहभागी होण्यास बिचकतात.  असो तो आत्ताचा विषय नाही. कासव प्रत्यक्ष अंडी घालताना पहायला मिळणे दुर्मिळच असते. ७/८ वर्ष काम करताना मी दोन वेळाच ते पाहू शकलो. कासव स्वतः वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते. 
कोळथरे येथील कामाची जबाबदारी मी घेतली होती म्हणून रोज पहाटे किनाऱ्यावर फेरफटका मारत असे. थंडीच्या दिवसात सकाळी  ६.०० – ६.३०  पर्यंत समुद्रावर अंधारच असतो. असाच एके दिवशी समुद्रावर गेलो असताना १०/१२ कुत्री रिंगण करून फिरताना पाहिली. लांबून काही समजेना, जवळ गेलो तर एक भला मोठा पक्षी पंख पसरून मधे उभा होता. त्याचा पंख विस्तार जवळपास सहा फूट असावा (आम्ही नंतर तो मोजलाच). कुत्रे बहुदा त्याचा अवतार पाहून बावरले असावेत, मी जवळ गेल्यावर सर्व पळून गेले. पक्षाचा अवतार पाहून त्याला पकडण्याचा माझाही धीर होईना, कसा तरी पकडून घरी आणला. घरी आणल्यावर पाहिले तर कोणतीही विशेष जखम दिसली नाही.  दरम्यान पाहुण्यासाठी तात्पुरता पिंजरा उभा केला आणि आगोमच्या औषधांचे उपचारही सुरु केले. या कामात माझ्या मुली, पुतण्या हिरीरीने सहभागी होतात.
चिपळूणला  भाऊ काटदरेना फोन करून वृतांत सांगितला, ते म्हणाले हा समुद्र गरुड ( White
Bellied Sea Eagle)  आहे आणि झाडाच्या फांदीवर जोरात आपटल्याने त्याला  मानसिक धक्का बसला आहे त्यातून बाहेर येण्यास एक दिवस तरी जाईल.
आम्ही त्याला मासे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काहीही खात नव्हता. त्याचे डौलदार शरीर, पोटाचा नितळ पांढरा रंग आणि राजेशाही रुबाब पाहून आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला मुक्त केले पण बागेतील घट्ट पोफळी (सुपारीची झाडे) मधून त्याला भरारी घेता आली नाही आणि शेजारील बागेत खाली कोसळला.  पडल्यावर त्याने पायात धरलेलं पोफळीचे पान   (झावूळ) आम्हाला कोयत्याने कापून काढावे  लागले, त्याची पकड इतकी घट्ट होती. शेवटी त्याला समुद्रावर नेऊन सोडल्यावर त्याने ‘गरुडझेप’ घेतली आणि क्षणात दिसेनाहीसा झाला.
खेड्यात रहाण्याचे अनेक फायदे, त्यातील हा एक. आणखी किस्से परत कधीतरी.
 
   
राम राम !

19 comments:

  1. मस्त डॉक्टर... पुस्तक येऊद्या लौकरच

    ReplyDelete
    Replies
    1. रामराम,
      प्रतिक्रियेला अक्षम्य उशीर केलाय, माफीनामा. सूचनेचा विचार करून पुस्तक प्रकाशित केले.

      Delete
  2. खूप छान आणि आटोपशीर पहिला ब्लॉग झाला आहे! असे किस्से वाचायला खूप मजा येईल! तर मग येउद्यात अजून ब्लॉग पोस्ट! ब्लॉगर बनल्याबद्दल अभिनंदन!

    ReplyDelete
  3. Very interesting episode!
    Thanks for saving the precious bird from dogs.
    Well done, Dr.Mahajan

    ReplyDelete
  4. माझी सूचना मनावर घेऊन ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! तुम्ही अतिशय सुरेख लिहिता. ब्लॉग नंतरची पुस्तकाची पायरी पण यथावकाश गाठाल यात शंका नाही! हा अनुभव छान लिहिला आहे! आता पुढील ब्लॉग पोस्टची उत्सुकता लागली आहे! अभिनंदन आणि खप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. Nice you all are very lucky to get chance to see this and interact

    ReplyDelete
  6. Nice you all are very lucky to get chance to see this and interact

    ReplyDelete
  7. I had seen the photos on Facebook ... I had seen some videos of Turtles laying eggs posted by you... With a runnign commentary in Marathi probably by your daughter... I remember this very much... Keep up good work Dr Ramdas... We are proud of you...

    ReplyDelete
  8. धन्यवाद!
    आमच्या वरील संस्कार 'चांगले' काम करवून घेतात. पुनश्च धन्यवाद.

    ReplyDelete
  9. वाह. मजा आली..

    ReplyDelete

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...