सायकलस्वारी सज्जनगडची
जून २०१३ मध्ये मी
पुण्याला राहण्यास आलो. पुण्याला येण्याआधी अंदाजे ५-६ वर्षे पूर्वीपासून सायकलिंग चा छंद लागला होता. त्याला कारणीभूत आहेत एक
सरदारजी, श्री. समिंदर सिंग सालुजा जे दिल्लीचे रहिवासी आहेत. श्री. समिंदरजी पुणे
गोवा सायकलिंग प्रवासा दरम्यान कोळथरेंला आले होते. मी माझ्याकडील गाडी, सायकल या विषयी विविध कात्रणे त्यांना
दाखविली आमच्या खूप गप्पाही झाल्या. जाताना म्हणाले डाक्टरसाब आप क्यु नही
सायकलिंग करते ? मी अडचणींचा पाढा वाचला तरी त्यांनी आग्रह सोडला नाही शेवटी त्यांच्याच सल्ल्यानुसार मी पहिली सायकल (ट्रेक ३६००) पुण्यात खरेदी केली. सायकल
कोळथरेंच्या पंचक्रोशीमध्ये यथेच्छ
चालविली. आमचे गाव समुद्रकिनार्यावर असल्याने कोठेही जायचे झाले की प्रथम पूर्ण
डोंगर चढावा लागे शिवाय रस्त्याची अवस्थाही दयनीय होती. या कारणांमुळे ती सायकल विकण्याचा निर्णय मी
घेतला.
घर में आप सौतन ला रहे हो’
ज्यावेळी मी सायकल खरेदी करण्याचे ठरविले
तेव्हाच मला सरदारजींनी बजावले होते ‘घर में आप सौतन ला रहे हो’| ‘‘तुम्ही घरात सवत विकत आणत आहात’’ याचा प्रत्यय सायकल
विकल्यावर मला आला. फार दिवस मी सायकल शिवाय राहू शकलो नाही आणि परत एक सायकल
(ट्रेक ४३००) विकत घेतली. पहिली सायकल घेतली त्या वेळेस पुण्यातही अशा सायकल्सचे ‘स्तोम’ माजलेले नव्हते. या वेळी मात्र पुण्याभर अशा सायकल्स (विविध
नाममुद्रा ) चा सुळसुळाट झाला होता. समिंदर सिंग यांच्या
प्रेरणेतूनच मी सायकलशी जोडला गेलो.
कालांतराने पुण्याला येताना अर्थातच सोबत सायकलही आणली. सुदैवाने मला श्री. राजेंद्र दीक्षित यांचा सारखा सच्चा ‘निसर्ग प्रेमी’ सायकलस्वार मित्र लाभला. त्यांच्या बरोबरीने आणि प्रेरणेने
पुणे शहरात कामासाठी चांगल्यापैकी सायकल सवारी
सुरु होती. पुण्यात कामानिमित्त फिरण्यासाठी मी गाडी वापरतच
नाही कायम सायकलनेच फिरतो. सायकलला मागील बाजूस ‘सायकल चालवा निसर्ग वाचवा’ असा
बोर्ड लावला आहे. सिग्नलपाशी उभा असताना
बरीच मुले ‘काका भारी एकदम’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात. एकदा असाच उभा होतो
शेजारी एक पोलीसकाका होते त्यांनी विचारले सायकल चालवा हे कळले पण निसर्ग वाचवा ही
काय भानगड ? एव्हढ्या गर्दीत त्यांना समजावणे माझ्या कुवती बाहेर होते. आमच्या शेजारील (लाडघर)
गावचे श्री बेडेकर ७-८ वर्षापूर्वी पुण्यात
स्थायिक झाले आहेत त्यांची योगायोगाने भेट झाली आणि गप्पांच्या ओघात त्यांचे
सायकलप्रेमही लक्षात आले. ते रोज व्यायामासाठी २०-२२ किमी सायकल सवारी करतात. त्यांच्या आग्रहाखातर एकदा सिंहगडावर सायकल स्वारीचा अयशस्वी प्रयत्न केला. मी ३/४ सिंहगड सर करुन माघार घेतली. काही दिवसांपूर्वी श्री.
बेडेकरांची पुनः भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या सज्जनगड वारीची माहिती दिली.
गेले ४-५ वर्षे ते दसर्याच्या
दिवशी पुणे ते सज्जनगड सायकल ने जातात कोण सोबत आले तर ठिक अन्यथा एकटेच.
१३५ ते १४० किमी सायकलिंग एका दिवसात प्रथमच करायचे म्हणजे खूप
प्रॅक्टिस हवी. मी पुण्यातल्या पुण्यात सायकल फिरवतो पण एवढया लांब पल्याचा अनुभव
नव्हता म्हणून ३-४ दिवस रोज २०-२५ किमी सासयकलिंगचा सराव केला.
तिन ऑक्टोबरला पहाटे ५.०० वाजता सिंहगड रोड वर
संतोष हॉल जवळ एकत्र येऊन दोघांनी प्रवास सुरु केला. कात्रज बायपासच्या
बोगदयामध्ये थोडे गुदमरल्यासारखे वाटू लागले कारण आधी घाट चढून दमलो होतो आणि बोगद्यात वायुविजन नव्हते, पण विशेष त्रास झाला नाही. उतार उतरुन शिरवळ जवळ चहा घेऊन लगेचच निघालो. श्री.
बेडेकरांच्या सल्ल्याप्रमाणे सायकलिंग करण्याचे ठरले होते, त्यांच्या म्हणण्यानुसार १० वाजेपर्यंत जास्तीत जास्त मजल मारु नंतर ऊन झाल्यावर त्रास
होईल म्हणून विश्रांती घेतली नाही.
नाष्टयाला खंडाळा गाठायचे ठरविले होते
त्याप्रमाणे तो गाठला पण मला थकवा जाणवु लागला होता मजल दर मजल करत खंडाळयाला
पोचलो पोहे खाल्ले आणि मस्त चहा प्यायलो. मला तरतरी आली, बेडेकर फ्रेशच होते.
शुगर, बी.पी. इ. त्रास होऊ शकतो
घाट चढायला सुरुवात केल्यावर माझे पाय दुखु लागले मी अधुन मधून ट्रकचा आधार घेत घेत घाट चढलो. बेडेकर मात्र जोशात पुर्ण घाट चढले. शिवाय ज्या ट्रकचा आधार मी घेतला होता त्याला एकदा ओव्हरटेक करुन पुढे गेले. घाट माथ्यावर रानातून काढून आणलेली ताजी सिताफळे विकत मुले बसली होती त्यांचा आस्वाद घेतला, अर्थात अशावेळी गोडी फार अधीक जाणवतेच.१०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन पुनः निघालो, सातार्याच्या आधी १५-२० कि.मी. अंतरावर एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो (चाह मी एकटाच घेणार होतो) टपरीवर एक ट्रकवाले गृहस्थ भेटले ते अहमदाबादहून बेंगलोरला चालले होते. आमचा इरादा ऐकून ते थक्क झाले आणि सद्भावनेपोटी आम्हाला सल्ला दिला, आता दुपार झाली आहे 3 वाजेपर्यंत आराम करा मग निघा. उन्हातून शुगर, बी.पी. इ. त्रास होऊ शकतो, कोणतेही नातं अथवा ओळख नसताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावानांची कमालच वाटली.
घाट चढायला सुरुवात केल्यावर माझे पाय दुखु लागले मी अधुन मधून ट्रकचा आधार घेत घेत घाट चढलो. बेडेकर मात्र जोशात पुर्ण घाट चढले. शिवाय ज्या ट्रकचा आधार मी घेतला होता त्याला एकदा ओव्हरटेक करुन पुढे गेले. घाट माथ्यावर रानातून काढून आणलेली ताजी सिताफळे विकत मुले बसली होती त्यांचा आस्वाद घेतला, अर्थात अशावेळी गोडी फार अधीक जाणवतेच.१०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन पुनः निघालो, सातार्याच्या आधी १५-२० कि.मी. अंतरावर एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो (चाह मी एकटाच घेणार होतो) टपरीवर एक ट्रकवाले गृहस्थ भेटले ते अहमदाबादहून बेंगलोरला चालले होते. आमचा इरादा ऐकून ते थक्क झाले आणि सद्भावनेपोटी आम्हाला सल्ला दिला, आता दुपार झाली आहे 3 वाजेपर्यंत आराम करा मग निघा. उन्हातून शुगर, बी.पी. इ. त्रास होऊ शकतो, कोणतेही नातं अथवा ओळख नसताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावानांची कमालच वाटली.
खरतर मी फार थकलो होतो पण ते दाखवणे मला योग्य
वाटत नव्हते कारण त्याचा परिणाम श्री. बेडेकरांवर होऊ शकला असता. त्यांचा निग्रह आणि स्टॅमिना पाहून मी थक्क झालो. मी कसा तरी
सातार्यामधील हॉटेल पर्यंत पोहोचलो. जेवताना बेडेकरांनी विचारले ‘सज्जनगडापर्यंत’ येणार ना? मी म्हणालो आधी
खाउया आणि मग ठरवू. प्रत्यक्षात मी मनाशी ठरविले होते सातारा शहर पार करुन आडोसा
पाहून थांबायचे. खाणे झाल्यावर पोवई नाका, शनिवार पेठ इ. भागातून
सातारा पार करत बोगद्यातून बाहेर पडलो. मी लगेचच माझा इरादा जाहीर केला. बेडेकरांनी थोडयाच अंतरावरील निवारा
(वडाच्या झाडाखाली बंद टपरी) सुचवला, मी तेथे थांबलो. श्री. बेडेकर पुढे सज्जनगड सर करण्यास
निघून गेले.
थोडया वेळाने पाऊस सुरु झाला त्यामुळे त्या आसर्यासाठी
एक गृहस्थ तेथे आले. त्यांचे वय अंदाजे ३० ते ३२ असावे. रंग, रुप, अंगकाठी, देहबोली पाहून मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही.
थोडयावेळाने तेच बोलू लागले. मी सायकल स्वारीची माहिती दिल्यावर काळजीच्या स्वरात
त्यांनीही सद्भावना व्यक्त केल्या. बोलता बोलता म्हणाले आम्ही ‘वडार’ लोक गोरगरीब कष्ट करुन कसे तरी जगतो म्हणून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न
करतोय.समाजात आम्ही दुर्लक्षित आहोत. आमच्या
आयाबहिणींचे छेडखानीचे प्रकार झाले तरी न्याय मिळत नाही. हे ऐकून मला दुःख झाले. पुढे म्हणाले १५ ऑगस्टच्या भाषणात मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
प्रत्येक आईबापाने आपल्या ‘मुलग्याकडे’ लक्ष दिले तर ही वेळ येणार
नाही. मी हे ऐकून खरच दिग्मुढ झालो. आपण ज्यांना अशिक्षित, मागास समजतो त्यांचे विचार
किती प्रगल्भ असू शकतात, हे प्रत्यक्ष अनुभवले. मा. मोंदीचा प्रभाव किती तळागाळा
पर्यंत पडतो आहे हेही जाणवले.
बरोबर दोन तासानी श्री. बेडेकर आले. सकाळी जसे होते तसेच फ्रेश ! एक मिनिटही आराम न करता लगेचच निघु म्हणाले. दरम्यानच्या काळात आगोम
तेलाने मॉलिश केल्याने मी ही ताजातवाना झालो होतो.
बेडेकरांच्या सूचनेवरुन मी लाटकरांच्या दुकानात पेढे घेण्यास गेलो. परत येऊन पहातो तर
श्री. बेडेकरांजवळ एक मोटरसायकलस्वार (रॉंगसाईडला) येऊन काही तरी बोलत होता. मला
त्याने विचारले काही खाल्ले का नाही? मी चेष्टेने म्हटले ‘छे छे आम्ही सातारकरांकडचे काही खात नाही’ त्याचमुड मधे तोही लगेच म्हणाला ‘भटजी दिसताय’! समाजात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा भाव अजूनही
दृढमूल असल्याने त्याने ही प्रतिक्रिया
दिली असावी. आम्हाला शुभेच्छा देऊन लगेच निघूनही गेला. नंतर मला बेडेकर म्हणाले मी
जेव्हा दुकानात गेलो होतो तेव्हा त्या व्यक्तीने जबरदस्तीने एक मिनरल वॉटर ची बाटली बेडेकरांना आणून दिली होती. अशी
समयसूचकता फार क्वचित पहायला मिळते. एकाच दिवसातला चांगुलपणाचा हा तिसरा ‘धक्का’ मी अनुभवला. सातारा स्टँड गाठून स्वतःच सायकली बस वर चढवून पुणे गाठले आणि ७.३० ला संध्याकाळी घरी सुखरुप पोचलो. लांब पल्याची ही पहिलीच
सायकल फेरी होती. भविष्यात आणखी किती आणि कशा सायकल सफारी होतात ते पाहू.
सायकलस्वारी ठळक गोष्टी:
एकूण प्रवास (माझा) ११० कि.मी.
वेळ सकाळी ५.१५ ते १२.१५
एकूण प्रवास (माझा) ११० कि.मी.
वेळ सकाळी ५.१५ ते १२.१५
प्रत्यक्ष सायकलींग ६ तास
सरासरी वेग १८.३ कि.मी. ताशी
कमाल वेग ४८ कि.मी. ताशी

