ए घुबड्या !
एक दिवस रामुदादाचा गिम्हवणेहून (दापोली) फोन आला, रामदास माझ्या अंगणात पक्षाची दोन पिल्ल पडली आहेत त्यांना कावळे त्रास देत आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे तू काहीतरी कर. मी पिल्लू म्हणतोय कारण त्यांना उडता येत नाहीये पण ते छोट्या कोंबडी एव्हढे आहेत.
रामुदादा म्हणजे माझा आतेभाऊ. आम्ही त्याला अरेतुरे करतो कारण नात्याने तो आमचा भाऊ लागतो पण जवळ-जवळ वडिलांच्या वयाचा. वयाने ज्येष्ठ पण उत्साही. माझे वडील ७ भावंडांमधे सर्वात लहान त्यामुळे वडीलांची भाचे मंडळी त्यांच्याच वयाची. परिणामी आम्ही लहान वयातच आजी आजोबा. तर रामुदादाच्या आज्ञेवरून पिल्ल आमच्या ‘संगोपनालयात’ भरती झाली. आम्ही घार म्हणतो तिची पिल्ल होती.
पक्षाच्या पिल्लांना लहानाचे मोठे करण्याचा मला फार अनुभव नव्हता पण जबाबदारी टाळूही शकत नव्हतो. वानर, मुंगुस, खारुताई, साळींदर ई दुध पिणाऱ्या पिल्लांना आम्ही लहानाचे मोठे केलेले आहे. पक्षाच्या पिल्लाला एकतर चोचीत भरवावे लागते आणि खायला काय द्यायचे हा आणखी एक प्रश्न असतोच. शिवाय घार हा शिकारी पक्षी असल्याने त्याची चोच आकड्याप्रमाणे असल्याने काम आणखी कठीण.

घराशेजारील गोशाळेला खेटून आम्ही एक कायम स्वरूपी संगोपनालय बांधले आहे. साधारण ८ x ८ फुट लांब-रुंद त्याला ४ फुटापर्यंत दगडी भिंत आणि वर लोखंडी जाळी असे स्वरूप. नवीन पाहुणा आला की त्याला हक्काचे घर तयारच असते. पाहुणा फार छोटा असल्यास त्याच्या आकाराचे छोटे पिंजरे आहेत त्यात ठेवून पिंजरा या घरात ठेवतो जेणेकरून शत्रूपासून विशेषकरून रात्री संरक्षण व्हावे.

पाहुण्याचे हक्काचे खाणे म्हणजे घट्ट भिजवलेली कणिक. कणकेची छोटी-छोटी भेंडोळी
करून ती थोड्या-थोड्यावेळाने भरवत रहावे लागते. घरचा व्यवसाय आणि शेती असल्याने
मदत करणारे हौशी सहाय्यक घरचेच. मुली, पुतणे सर्व हिरीरीने सहभागी होतच असतात. आमच्या
अथक प्रयत्नांनंतरही एका पिल्लाला आम्ही वाचवू शकलो नाही. दुसरं पिल्लू थोडं जाणते
झाल्यावर त्याला लहान-लहान मासे खाऊ घालायचो. थोडे दिवसांनी ‘लालू’- अरे हो त्याचे
नाव आम्ही लालू ठेवले होते, का ते विचारू नका, मोठे मासे चिरफाड करून खात असे.
खाताना एक चि-चि असा आवाज करे. लाडात आला किंवा भूक लागली की पायाजवळ येऊन नखाने
अथवा चोचीने खाजवत आवाज करायचा.
आमचे कोळथरे गाव समुद्रकिनारी असल्याने गावाची एक विशिष्ट रचना आहे. गावातून
जाणारा एक मुख्य रस्ता आणि दुतर्फा एकमेकाला खेटून असणारी घरं. गावातील प्रत्येक
समाजाचा एक ‘खास’असा व्यवसाय असतो. कोळी बांधव ज्यांना आम्ही खारवी म्हणतो ते
अर्थातच मासेमारीचा व्यवसाय करतात. कोळी भगिनी रोज ठराविक वेळेला सर्व गावात फिरून
मच्छी विकतात. डोक्यावर बांबू पासून बनविलेली टोपली, टोपली खाली पूर्वी विरी (
सुपारीच्या पानाची एक बाजू) असे आता ताट असते, टोपलीवर एक लाकडी पातळ फळी आणि
हातात एक छडी(काठी),असा सरंजाम असतो. काठीचा वापर टोपलीवर झुंजा मारणारे कावळे आणि
पाठी फिरणारी गावातील मांजरे यांना हाकलण्यासाठी. आम्ही दारावरून जाणाऱ्या मावशीना
बामणाला उपासाचे मासे द्या म्हटले की त्या लगेच बचक मारून मासे देऊन घाईघाईने
निघून जात, त्यांना आमचे कडून मोबदला घ्यायचा नसे. आम्ही घरातील कुत्रा, मांजर
यांना ते देत असू.

लालू पुरेसा मोठा झाला होता म्हणून आम्ही त्याला मुक्त केले. पहिले काही दिवस
घराशेजारीच तो आकाशात घिरट्या घालायचा आणि
मी हाक मारली की लगेच खाली येऊन खाऊ खाऊन लाड करून घ्यायचा. त्याच्या बसण्याच्या
जागाही ठरलेल्या असत. घरासमोर एक छोटी इमारत आहे. इमारतीच्या भिंती मधून बडोदाचे
(आम्ही त्याला भाल म्हणतो) टोक बाहेर आले आहे त्यावर लालू बसत असे. एक दिवस मावशी मच्छी
घेऊन रस्त्यावरून निघाली होती, लालूची स्वारी त्या बडोदावर बसलेली होती. नेहमी
प्रमाणे पाठी लागणाऱ्या मांजरांना हाकलण्याकडे तिचे लक्ष होते. लालूने अचानक
तिच्या टोपलीवर झडप घातली क्षणभर मावशीला काहीच कळले नाही एकदम एव्हढा मोठा पक्षी
कुठून आला असा प्रश्न तिला पडला असावा. ती बावरली आणि काठी फिरवत जोराने ओरडली ‘ए
घुबड्या’. नक्की तिला काय म्हणायचे होते कोण जाणे
ती तिची प्रतिक्षिप्त क्रिया होती. आम्ही मात्र लालू त्या जागेवर येऊन बसला
की ओरडायचो ए घुबड्या.
काही दिवसांनंतर लालू दिसे नाहीसा झाला. तिचे भाऊबंध आकाशात किवा माडावर(नारळाचे झाड) बसलेले दिसले की मला कायम वाटायचे हा लालू असला तर मला बघून खाली येईल. पण तसे कधी घडले नाही.
या सर्व अनुभवातून एक जाणवले पक्षाना देखील माणसाचा लळा लागतो आणि ते हाकेला सादही देतात.